शाळेचा पहिला दिवस..पारंपारिक स्वागत



श्री गणेश म्हणजे आपला गणपती बाप्पा आणि मां सरस्वती ह्या दोन्हीही बुद्धीच्या देवता. म्हणून कदाचित ह्या दोन्हींची प्रतिमा आपल्या सर्वांच्या शाळेत असते. गणपती बाप्पा बघितला की खूप उत्साह येतो , आनंद वाटतो आणि आई रुपी सरस्वती बघितली की काळजी घेणाऱ्या शिक्षिका समोर येतात, कारण शाळा हे मुलामुलींना विद्या देण्याचे त्यांना एक चांगले नागरिक घडविण्याचे एक केंद्र असते. 

मागील दोन वर्षात Covid 19 मुळे शाळेत जाण्यासाठी आतुर चिमुकले विद्यार्थी आणि तेव्हढेच मुलांच्या शाळेतील शिक्षणासाठी आतुर झालेले त्यांचे पालक ह्यांची घालमेल आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवली असेलच. 
त्या गंभीर त्रासदीतून बाहेर पडून , online शाळेचे बंध सोडून आता ही चिमुकली पाखरे आपले पंख पसरविण्यासाठी ह्या वर्षी पासून शाळेत येत आहेत.
मग, त्यांचे तसे स्वागत नको का करायला ? नक्कीच करायला हवे ,म्हणून शाळेने ठरविले की ह्या वर्षी पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणाऱ्या मुलांचे स्वागत एकदम जंगी करायचे.
त्यासाठी शाळेचे प्रवेशद्वार रांगोळी काढून सजवले होते.
आता, जंगी स्वागत म्हंटले की आपल्याला आठवतो तो गणेश आगमनासाठी वाजणारा ढोल ताशा...आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्याआधी मराठी वादन संस्कृती चा साज म्हणजे अंगावर रोमांच उभे करणारी तुतारी आणि ते वाजवून ह्या छोट्या गणेश आणि सरस्वतींचे स्वागत म्हणजे आज शाळेत सुरू झालेला एक सोहळाच होता जणू.
आपुलकीच्या समीर रुपदे व प्राजक्ता रूपदे ह्यांच्या व शौर्य ढोलताशा पथकाच्या साहाय्याने आजचा हा स्वागत कार्यक्रम जोशात साजरा झाला.
सुहास माळी ह्यांनी तुतारी आणि शंख वादन करून मुलांना ह्या वाद्याची माहिती दिली. स्वागत करतानाही एक अनोखी शिकवण शाळेने दिली.
Pre- primary aami Primary बरोबरच secondary च्या मुलांनाही तुतारी आणि शंख वादनाची माहिती देण्यात आली.

स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाचे अध्वर्यू आणि शिक्षण प्रसारक मंडळीेच्या स्थापनेमागील प्रणेते विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या वेशातील पासलकर काका (फेटे वाले ) ह्यांनी  शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 
विद्यार्थ्यांना लाडू भरवला आणि त्यांचे औक्षण करण्यात आले. अशा ह्या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांनी ज्ञानमंदिरात प्रवेश केला.

भारतीय संस्कृती जपण्याचा, ती पुढे नेण्याचा आणि मुलांमध्ये रुजविण्याचा प्रत्येक प्रयत्न आज शाळेने केला...आणि तो ती यापुढेही करत राहील. 

मुलांबरोबर त्यांच्या पालकांचेही शाळेने स्वागत केले. 
आई बाबांनी हात धरून मुलांना अगदी वर्गात नेऊन सोडल्याचा एक वेगळाच आनंद प्रत्येक मुला/मुलीच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. 

आम्हाला खात्री आहे की मुलांना आणि त्यांच्या पालकांना आमचे हे स्वागत नक्कीच आवडले असणार.
 
संस्थेचे उपाध्यक्ष श्री.श्रीकृष्ण चितळे सर व शाळा समितीचे सदस्य श्री. सुधीर काळकर सर उपस्थित होते.







 

Comments

  1. हा खूप छान उपक्रम केला आहे शाळेने. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुलांचे स्वागत म्हणजे प्रत्येक मुला मुलीला किती आनंद झाला असेल हा विचार केला तरी आपल्याला खूप आनंद होतो.
    स्तुत्य उपक्रम .

    ReplyDelete

Post a Comment