शाळेचा पहिला दिवस..पारंपारिक स्वागत
श्री गणेश म्हणजे आपला गणपती बाप्पा आणि मां सरस्वती ह्या दोन्हीही बुद्धीच्या देवता. म्हणून कदाचित ह्या दोन्हींची प्रतिमा आपल्या सर्वांच्या शाळेत असते. गणपती बाप्पा बघितला की खूप उत्साह येतो , आनंद वाटतो आणि आई रुपी सरस्वती बघितली की काळजी घेणाऱ्या शिक्षिका समोर येतात, कारण शाळा हे मुलामुलींना विद्या देण्याचे त्यांना एक चांगले नागरिक घडविण्याचे एक केंद्र असते. मागील दोन वर्षात Covid 19 मुळे शाळेत जाण्यासाठी आतुर चिमुकले विद्यार्थी आणि तेव्हढेच मुलांच्या शाळेतील शिक्षणासाठी आतुर झालेले त्यांचे पालक ह्यांची घालमेल आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवली असेलच. त्या गंभीर त्रासदीतून बाहेर पडून , online शाळेचे बंध सोडून आता ही चिमुकली पाखरे आपले पंख पसरविण्यासाठी ह्या वर्षी पासून शाळेत येत आहेत. मग, त्यांचे तसे स्वागत नको का करायला ? नक्कीच करायला हवे ,म्हणून शाळेने ठरविले की ह्या वर्षी पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणाऱ्या मुलांचे स्वागत एकदम जंगी करायचे. त्यासाठी शाळेचे प्रवेशद्वार रांगोळी काढून सजवले होते. आता, जंगी स्वागत म्हंटले की आपल्याला आठवतो तो गणेश आगमनासाठी वाजणारा ढोल ताशा...आणि प्...